🕒 1 min read
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याला मुंबईकरांसाठी मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याच पाश्वर्भूमीवर शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असताना पाहायला मिळत आहे.
मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून ‘काम केलंय मुंबईने पाहिलंय’ असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
