Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुढीपाडव्या निमित्त अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अशा अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत- नरेंद्र मोदी

‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. तसेच आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

ईश्वराने सर्वांना सुख,समाधान,आरोग्य, ऐश्वर्य द्यावं- देवेंद्र फडणवीस

‘आज गुढीपाडवा! नवी सुरूवात, नवे संकल्प…,नवे वर्ष…मराठी नूतन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्याप्रकारे आपल्या देशात एक नवचैतन्य आता आपल्याला पाहायला मिळतय आणि पहिल्यांदा आपल्या अस्मितेला एक नव तेज आपल्या देशात ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपल्याला येताना दिसतय. त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून आजच्या या नववर्षाच्या निमित्त मी एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करीन, की आपल्या सर्वांना ईश्वराने अतिशय सुख,समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं’, असे फडणवीस म्हणाले.

गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला- अजित पवार

‘कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…”सर्वांना ‘गुढीपाडवा’ आणि ‘मराठी नववर्षा’च्या मनःपूर्वक शुभेच्छा. वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरू होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनाबाबतचे निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. या काळात अवलंबलेली स्वच्छता,सुरक्षिततेची सवय वैयक्तिक,सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया. निरोगी,बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया’, असे म्हणत अजित पवारांनी जनतेला गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

नकारात्मकतेवर मात करून नव संकल्पांची गुढी उभारूया- शरद पवार

‘गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी नकारात्मकतेवर मात करून नव संकल्पांची, यशाची आणि समृद्धीची गुढी उभारूया. येणाऱ्या नव्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुबत्ता येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो, ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा’, असे पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!