🕒 1 min read
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जला केकेआरने धुव्वादार गोलंदाजीच्या बळावर केकेआरने १३७ धावांवर रोखले होते. ज्याचा पाठलाग करताना कोलकाताने ६ विकेट्सने सामना जिंकला.
सामन्यात गोलंदाजी करताना उमेश यादवने (umesh yadav) सामन्यात ४ विकेट्स घेत स्पर्धेत पर्पल कॅप आपल्या नावे केली. त्याने पंजाबच्या (PBKS) संघातील खेळाडूंना पळवून लावले. पंजाबकडून केवळ शेवटच्या फळीतील कागिसो रबाडा आणि ओरियन स्मिथ यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या कामगिरीने पंजाब १३७ पर्यंत पोहचू शकला. वानखेडेच्या या फलंदाजी विकेटवर केकेआरच्या फलंदाजांनीही चांगली सुरुवात केली.
१३८ चा पाठलाग करताना सलामीची जोडी लवकर माघारी परतल्यावर केकेआरचा कर्णधार श्रेयस आणि सॅम बिलिंग्सने पारी सांभाळली. मात्र यानंतर पंजाबच्या राहुल चहरने श्रेयसची विकेट बघत दुसऱ्या चेंडूत नितेश राणालाही शून्यावर माघारी पाठवले. पंजाबचे राणाला बाद करणेच महागात पडले. कारण यानंतर फलंदाजीला आल्या आंद्रे रसेलने (andre russel) धुव्वादार बॅटिंग केली. त्याने ३१ चेंडूत ७० धावा करत आपल्या मसल पॉवरने केकेआरला आरामात सामना जिंकून दिला. या विजयासह कोलकाता आता पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: उमेश यादवने उडवली पंजाबची विकेट! केकेआर १३८ धावांचा पाठलाग करणार
- IPL 2022: सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड मोडल्यानंतर मलिंगाने दिली प्रतिक्रिया ; डीजे ब्रावोसाठी केले खास ट्विट
- ‘या’ गुडन्यूज बाबत कॉमेडीयन भारती सिंग म्हणाली…
- IPL 2022: पंजाब विरुद्ध नाणेफेक जिंकत किंग खानच्या संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय ; कागिसो रबाडाचे पंजाबमध्ये पर्दापण!
- मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रण नाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
