🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणातील तपास सीबीआयकडून काढून घेण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझेचा ताबाही सीबीआयकडे गेला असून १०० कोटी वसुलीप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे.”दूध का दूध पानी का पानी” ही अनिल देशमुख यांची इच्छा सीबीआय नक्की पुरी करेल,’ असे भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने अनिल देशमुख प्रकरणी यापूर्वी मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून काढून घेण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती.
महत्वाच्या बातम्या
- जगात सर्वात जास्त तापमान अकोल्यातचं का?
- “पाकीटमारीत तर तुमची PHD असेल”, संजय राऊतांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर
- IPL 2022: अरेरे! ‘बेबी एबी’ आयुष बदोनीच्या षटकाराने स्टॅन्डमधील महिला प्रेक्षक घायाळ
- CNG आणि PNG गॅसच्या दरांत झाली घट; अजित पवारांची माहिती
- मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही- बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
