मुंबई : गेल्या काही वर्षात तर, जगातील सर्वोष्ण शहरांमध्ये अकोल्याचे नाव नोंदले गेले आहे. जगात सर्वात जास्त तापमान असणाऱ्या शहरामध्ये अकोल्याचा दुसरा नंबर आहे. उष्णतेच्या लाटेत अकोल्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. जणू काही सूर्य अकोल्यात आग ओकतोय असा भास होत असून, मार्चमध्येच पारा ४४ अंश सेल्सिअसपुढे गेला आहे. गेले तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहे. बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस अकोल्याचे तापमान ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.
सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान हे तीन अंश सेल्सियसने अधिक असेल किंवा सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असेल अशा स्थितीला उष्णतेची लाट असे संबोधले जाते. अकोल्यात सलग तीन दिवसांपासून उष्णतामान हे ४३ अंशाच्या पुढे असल्याने मार्चमध्येच नागरिकांना मेचा अनुभव आला.
महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान विदर्भातच का असते?
विदर्भ हा विश्ववृत्तवार वसलेला प्रदेश आहे.त्यामुळे सूर्याची किरणे सरळ सरळ या भूभागावर पडतात. त्यामुळे इथले तापमान जास्त आहे. तसेच विदर्भ डंखण च्या पठारावर आहे. येथे आसपास समुद्रकिनारा नसल्यामुळे त्याचाही परिणाम तापमान वाढीवर होताना दिसतो. तसेच विदर्भामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षात मोठ्या प्रमाणावर जंगलतोंड झाली आहे.मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे रस्ते तयार झालेले आहेत याचा परिणाम तापमानवर झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या :


