🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 च्या १५व्या हंगामातील ७ वा सामना गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स (CSK vs LSG) यांच्यात खेळला गेला. सामना अतिशय रोमांचक पद्धतीने संपला. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, गुरुवारी संध्याकाळी खेळाला कलाटणी मिळाली. सुरुवातीला विजय चेन्नईच्या बाजूने आल्याचे दिसत होते. पण, शिवम दुबेच्या १९व्या षटकाने सामन्याचे चित्रच बदलून टाकले आणि के एल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने विजयाची नोंद केली.
या सामन्यात सुपर जायंट्सने (LSG) ६ गडी राखत रोमांचक विजय मिळवला. यानंतर संघातील अनेक खेळाडूंवर विविध पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. यात विशेष म्हणजे अंतिम षटकात विजय निश्चित करणाऱ्या परदेशी खेळाडू एविन लुईसला (Evin lewis) सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला २३ चेंडूत ५५ धावांची धमाकेदार खेळी करण्यासाठी मैन ऑफ द मैच , ड्रीम इलेवन गेम चेंजर ऑफ द मैच, पंच सुपर स्ट्राइकर ऑफ द मैच आणि अपस्टोक्स मोस्ट वेल्यूएबल ऑफ ऍसेट ऑफ द मैच या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
चार पुरस्कार जिंकल्यानंतरही एविन लुईसने शेवटच्या षटकात त्याच्या सोबत असलेल्या युवा खेळाडू आयुष बदोनीचे (ayush badoni) कौतुक केले. तो म्हणाला, ‘ खूप चांगली पीच होती, एकदा तुम्ही आत गेल्यावर तुम्ही मुक्तपणे धावा करू शकता. मी फक्त माझ्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे समर्थन केले. मला वाटते की बदोनी खूप आत्मविश्वासी माणूस आहे. मी त्याला नेट्समध्ये पाहिले. मी फक्त खेळ सोपे ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू इच्छितो.’
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका
- “मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
- IPL 2022: CSKच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर संतापला कर्णधार जडेजा; खराब कामगिरीचे कारण केले स्पष्ट
- IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’
- “जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो…”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
