🕒 1 min read
मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ड्वेन ब्रावोने लसिथ मलिंगाचा सर्वाधिक विकेट घेण्याचा सर्वकालीन विक्रम मोडून CSK च्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. ब्रावोने सुपर जायंट्सचा फलंदाज दीपक हुडाला १३ धावांवर बाद करून त्याच्या १५२ व्या आयपीएल सामन्यात १७१ वी विकेट घेत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
हंगामाच्या सलामी सामन्यात, ब्रावोने (dwayne bravo) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३ बळी घेत लसिथ मलिंगासह (lasith malinga) बरोबरी साधली होती. आता तो अव्व्ल स्थानी पोहचला आहे. त्याच्या मागे लसिथ मलिंगा १२२ सामन्यात १७० विकेट, अमित मिश्रा १५४ सामन्यात १६६ विकेट, पियुष चावला १६५ सामन्यात १५७ विकेट आणि हरभजन सिंग १६० सामन्यात १५० विकेट असे खेळाडू आहेत. सध्या यातील एकही खेळाडू आयपीएल २०२२चा भाग नाहीये. ज्यामुळे ब्रावोचा रेकॉर्ड बराच काळ अबाधित राहणार आहे.
ड्वेन ब्रावो आणि भुवनेश्वर कुमार हे दोनच गोलंदाज आहेत ज्यांनी दोनदा पर्पल कॅप जिंकली आहे. सर्व T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीतही ब्राव्हो आघाडीवर आहे. २००६ पासून ५२३ सामन्यांमध्ये ब्राव्होने २४.०८ च्या सरासरीने ५७४ विकेट घेतल्या आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : CSKच्या शिवम दुबेची धुव्वादार बॅटिंग! चाहत्यांना आठवला युवराज सिंग
- IPL 2022 : थाला..थाला..थाला! महेंद्रसिंह धोनीचा मुंबईत मोठा पराक्रम; नक्की वाचा!
- IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर
- IPL 2022 : ९ चेंडूत ३८ धावा..! मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर घोंगावलं उथप्पाचं वादळ!
- IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
