🕒 1 min read
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने मोठी कामगिरी केली. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
धोनीने लखनऊविरुद्ध ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६ धावा काढल्या. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. या डावात त्याचा स्ट्राइकरेट २६६.६७ होता. आता धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला.
धोनीने आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट एकत्र करून टी-२० क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात याआधी कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही, तर त्याच्या आधी केवळ पाच भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी केली असून त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांच्या नावाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर
- IPL 2022 : ९ चेंडूत ३८ धावा..! मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर घोंगावलं उथप्पाचं वादळ!
- IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला
- IPL 2022 : देखो वो आ गया..! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मिळाली आनंदाची बातमी
- IPL 2022: CSKला टक्कर देण्यास LSG तय्यार..! नाणेफेक जिंकत राहुलचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
