🕒 1 min read
मुंबई: आयपीएलचा ७ वा सामना आज म्हणजेच ३१ मार्च रोजी नवीन आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघात आज धडकेबाज गोलंदाज अँड्र्यू टायचे पर्दापण होत आहे. तर आखिर मोईन अली चेन्नई संघात दाखल झाला आहे.
रवींद्र जडेजा (ravindra jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांनीही कर्णधार म्हणून आपला पहिला सामना गमावला आहे. आज केएल राहुलचा नवखा संघ आयपीएलमधील सर्वात अनुभवी संघ चेन्नईशी मुकाबला करेल. अशा स्थितीत लखनऊ आणि चेन्नई यांच्यात जोरदार स्पर्धा होऊ शकते. दोन्ही संघात आज मोठी चुरस दिसू शकते. चेन्नईच्या ‘थाला’ धोनीला मागच्या सामन्यात फॉर्म गवसला आहे. ज्यामुळे आजही चाहते त्याच्या कडून मोठ्या खेळीची अपेक्षा करत आहेत.
दोन्ही संघ
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (C), एमएस धोनी (WK), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, तुषार देशपांडे
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (C ), क्विंटन डी कॉक (WK), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- सण साजरे करत असताना कोणतेही निर्बंध लागू नाहित – जितेंद्र आव्हाड
- चेहऱ्यावर रक्ताचे डाग! सनी लिओनीचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
- मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मेट्रोचा दौरा
- शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी चक्क अस्वल ठेवलं नोकरीवर; महिना १५ हजार रुपये
- आर्यन खान ड्रग्जप्रकरणी न्यायालयाकडून ‘NCB’ ला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
