Share

IPL 2022: शेल्डन जॅक्सनची कॅच बघून रैनाला आठवला गिलक्रिस्ट ; VIDEO व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 मध्ये, सहावा लीग स्टेज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये आरसीबीने शेवटच्या षटकात केकेआरचा ३ विकेटने पराभव केला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांची गोलंदाजी चांगलीच होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनंतर या सामन्यात कोलकाताचा यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने आपल्या यष्टीरक्षणाने सर्वांना प्रभावित केले आहे. आरसीबीच्या शार्फेन रदरफोर्डला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या सामन्यात शेल्डन जॅक्सनने (Sheldon jackson) विकेट किपींग करताना एक अद्भुत कॅच पकडली. झाले असे की , RCBच्या डावाच्या १८ व्या षटकात ही घटना घडली. कोलकाताचा (KKR) कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) १८ वी ओव्हर संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज टीम साऊदीला दिले. आरसीबीसाठी, शर्फीन रदरफोर्ड पीचवर उभा होता आणि बराच वेळ फलंदाजी करत होता. ओव्हरचा दुसराच चेंडू रदरफोर्डच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू विकेटच्या मागे शेल्डन जॅक्सनच्या विरुद्ध दिशेने जात होता. ज्याला पकडणे सोपे नव्हते. पण जॅक्सनचे रिफ्लेक्सेस इतके अप्रतिम होते की त्याने हवेत उडत तो झेल घेतला. हा झेल पाहून अनेकांना अॅडम गिलक्रिस्टची (Adam gilchrist) आठवण झाली.

गिलक्रिस्टही असेच काही कॅच घ्यायचा. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरेश रैनानेही शेल्डन जॅक्सनचा हा कॅच पाहून माजी दिग्गज अॅडम गिलख्रिस्टचीही आठवण आल्याचे सांगितले. केकेआरने सामना जरी गमावला असला तरी शेल्डनचे कौतुक होत आहे. तसेच त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!