🕒 1 min read
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्यात मुद्द्यावर आपण चर्चा करतो. नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्यावरील प्रश्नावर अजित पवार यांनी नो कमेंट म्हटलंय. सतीश उकरेंच्या कारवाईवर प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं आहे.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी वकील सतीश उके यांना अटक करण्यात आली. बनावट दस्तावेज तयार करून जमीन बळकावल्याचा सतीश उके यांच्यावर आरोप आहे. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडी कार्यालयात आणलं. उके बंधू सीजीओ कॅाम्प्लेक्स परिसरातील ईडी कार्यालयात आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून उके बंधूची चौकशी सुरू आहे. प्रॅापर्टी खरेदीबाबत ईडी उके बंधूंची चौकशी करत असल्याची माहिती आहे.
प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. त्यानंतर ईडीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. याबद्दल प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 50 हजार रुपये!
“…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा
IPL 2022: सामना जिंकताच फाफचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘दिनेश कार्तिक धोनी सारखा…’
“भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान..” सलमान खानचे व्यक्तव्य चांगलेच चर्चेत
“शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
