Share

‘या’ योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार हेक्टरी 50 हजार रुपये!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. यासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करुन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. नैसर्गिक शेतीसाठी दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.

या आहेत दोन योजना –

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून 2015-16 पासून दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक कृषी योजना आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश असणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय असणार आहेत. सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असला तरी शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होणार आहे.

केंद्राची भूमिका –

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि 3 वर्षांसाठी तात्पुरती मदत करणार असल्याचे कृषी कल्याण मंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे हेक्टरी 31 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्याचबरोबर मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्याचे कोणतेही कर्ज, दर्जेदार बियाणे, प्रक्रिया आणि इतर कामांसाठी हेक्टरी 46 हजार 575 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी दिले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

“शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
“नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
IPL 2022: आज धोनीच्या अनुभवी CSKला के एलचा नवोदित LSG संघ भिडणार; जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड
“जब घटीयापन का राज हो…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
“महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलंय”, सदाभाऊंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!