🕒 1 min read
मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२२च्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा ३ गडी राखून पराभव केला. कोलकाताच्या १२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची दमछाक झाली, पण अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
कोलकात्याच्या डावात फाफ डु प्लेसिसने एक रिव्ह्यू घेतला. जो आता हसण्यावारीचा विषय बनला आहे. तो रिव्ह्यू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू मानला जातो. ही घटना आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यात घडली जेव्हा हर्षल पटेल गोलंदाजी करत होता आणि केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती स्ट्राइकवर होता. हर्षलने एक चांगला चेंडू टाकला, ज्याचा वरुणने चांगला बचाव केला. मात्र, चेंडू थेट पॅडवर आदळल्याचे हर्षलला वाटले.
यानंतर फाफ डु प्लेसिसने एलबीडब्ल्यूचा रिव्ह्यू घेतला. मात्र चेंडू सरळ जाऊन वरुण चक्रवर्तीच्या बॅटच्या मधोमध आदळला. अशा परिस्थितीत आता हा रिव्ह्यू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा
- IPL 2022: सामना जिंकताच फाफचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘दिनेश कार्तिक धोनी सारखा…’
- “भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान..” सलमान खानचे व्यक्तव्य चांगलेच चर्चेत
- “शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- “नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
