🕒 1 min read
दिल्ली : संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. म्हणाले, “आम्ही सुध्दा व्यवस्थित संदर्भात जिथे माहिती द्यायची आहे, तिथे दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर किंवा पुराव्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही”.
पुढे म्हणाले, म्हणून तर मी म्हणतो हा गमतीचा विषय आहे. चिंतेचा विषय नाही. आज मी नागपूरातल्या धाडीविषयी माहिती पाहिली. मला अनेकांनी नागपूरातून फोन केले. अनेक पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आच्छर्य वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील. असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच विरोधी पक्षातील नेते म्हणतात कर नाही त्याला डर कशाला किंवा सगळं काही कायद्याने होत आहे. तुम्ही जे केलेलं कृत्य आहे त्याचे आम्ही पुरावे दिले आहेत. त्यावर एजन्सी कारवाया का करत नाही. हा सत्याचा आणि न्यायाचा जो तराजू आहे तो चोर बाजारातील तराजू आहे. पण शेवटी तराजू हा असा सरळ पाहिजे. ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवरती केली.
महत्वाच्या बातम्या –
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
“अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला
“The Kashmir Files चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व…”; संजय राऊतांचा भाजपला टोला
‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप
“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
