🕒 1 min read
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (३१ मार्च) संसदेच्या आवारामध्ये काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केले.यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी एका बाईकला हार घालून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध केला.राहुल गांधी यांनीही बाईकला हार घालत आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी गॅसची दरवाढ मागे घ्या, गरिबांना लुटणं बंद करा, महागाई वाढवणं बंद करा, मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी अशा घोषणाही देण्यात आल्या.काँग्रेसचे खासदार आणि वेगवेगळ्या राज्यांमधील नेते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मागील दहा दिवसांमध्ये नऊ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आली. याचा थेट फटका गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना बसत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
दरम्यान महाराष्ट्रातही काँग्रेसकडून याचा निषेध करण्यात येत आहे. “मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली असून आठवड्याभरात इंधनात ६.४० रुपयांची दरवाढ झाली आहे. हे पाकिटमार मोदी सरकार असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- “नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
- IPL 2022: आज धोनीच्या अनुभवी CSKला के एलचा नवोदित LSG संघ भिडणार; जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड
- “जब घटीयापन का राज हो…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- “महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलंय”, सदाभाऊंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
