Share

“…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे रोज सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole ) यांनी ट्वीट करत भाजपला इशारा दिला आहे.

“मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली असून आठवड्याभरात इंधनात ६.४० रुपयांची दरवाढ झाली आहे. हे पाकिटमार मोदी सरकार असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान आजपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. आज सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. त्यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!