🕒 1 min read
मुंबई: फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने IPL 2022 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या साखळी टप्प्यातील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) ३ गडी राखून पराभव केला. सामन्यापूर्वी फाफने नाणेफेक जिंकून केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत केवळ केकेआरला १२८ वर रोखले आणि लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकला.
या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाज हसरंगा (Vanaindu hasranaga) आणि हर्षल पटेलने अप्रतिम कामगिरी केली. ज्यामुळे केकेआर १२८ वरच थांबला. मात्र आरसीबीसाठी एका वेळी हे १२९ करणेही जड जात होते. उमेश यादव आणि टीम साऊदीने सुरुवातीचे धक्के देताना आरसीबीला बॅकफूटवर ढकलले होते. आरसीबीच्या कमी धावसंख्येचा पाठलाग म्हणजे शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी ७ धावांची गरज होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजयाच्या जवळ आणले. त्याची फलंदाजी पाहता कॅप्टन फफने (faf du plessis) दिनेशची (dinesh kartik) तुलना महेंद्रसिंग धोनीशी (MS Dhoni) केली आहे.
दिनेश कार्तिकबद्दल प्रश्न विचारला असता, फाफ म्हणाला, ‘शांत मनाने मैदानात राहण्यासाठी दिनेश कार्तिक एमएस धोनी सारखाच आहे. मी संघातील इतर खेळाडूंचीही मदत घेतो, आमच्या संघातील संवाद खूप चांगला आहे. आम्ही सर्व एकमेकांशी चर्चा करतो.’ आरसीबीने केकेआरला पराभूत करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- “नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
- IPL 2022: आज धोनीच्या अनुभवी CSKला के एलचा नवोदित LSG संघ भिडणार; जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड
- “जब घटीयापन का राज हो…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- “महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलंय”, सदाभाऊंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
