🕒 1 min read
मुंबई: प. बंगालातील विधानसभेत भाजप व तृणमूलमध्ये दंगल झाली. वीरभूमीतील हिंसा निषेधार्ह आहे, पण त्या हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम तेथील भाजपवाले करीत आहेत. वीरभूमी हिंसेच्या निमित्ताने ममतांचे सरकार बरखास्त करण्यासाठी जर भाजपचे हे अघोरी प्रयोग असतील तर ते योग्य नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप येथील महाविकास आघाडी सरकार उलथवू पाहत आहे. तेलंगणा, तामीळनाडू, केरळातही विरोधकांची सरकारे अस्थिर करण्याचे डावपेच सुरूच आहेत. शिवाय ज्या भाजपशासित राज्यांतला विरोधी पक्ष सक्रिय व लोकाभिमुख आह , तेथे विरोधकांवर दाबदबावाचे प्रयोग चालले आहेत. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
झारखंड, छत्तीसगढ़ भाजपच्या टार्गेटवर आहेत. ज्या राज्याचे मुख्यमंत्री ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व देशाचे दुश्मन असे या मंडळींनी ठरवून टाकले आहे! अशा मानसिकतेतून देशाला बाहेर काढणारे नेतृत्व विरोधी पक्षांत आहे काय? असेल तर त्यावर एकमताची मोहोर उठेल काय? ते घडणार असेल तरच ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नास काही अर्थ आहे. भाजपप्रणीत ‘एनडीए’ उरलेले नाही, पण काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ तरी आज कोठे दिसत आहे काय? यूपीएत नक्की कोण आहे व त्यांचे काय चालले आहे याबाबत शंका आहे. विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी ‘यूपीए’चा जीर्णोद्धार करणे. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत
IPL 2022: ”तो यंदा ६०० पेक्षा जास्त धावा करेल”, एबी डिव्हिलियर्सची विराटबाबत मोठी भविष्यवाणी!
IPL 2022 RCB vs KKR : कोलकाताची झुंज अपयशी; बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय!
VIDEO: हसरंगाच्या गुगलीचा शेल्डन जॅक्सन ठरला बळी, चेंडू पडल्यानंतर कसा वळला ते तुम्ही पाहाच
IPL 2022 RCB vs KKR : हसरंगाचा ‘अतरंगी’ स्पेल..! कोलकाताचं बंगळुरुला १२९ धावांचं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
