Share

IPL 2022 RCB vs KKR : कोलकाताची झुंज अपयशी; बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय!

Published On: 

मुंबई : फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सला ३ गड्यांनी मात देत यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत कोलकाताने बंगळुरूला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले. नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम दमदार गोलंदाजीचा नजराणा पेश करत कोलकाता नाइट रायडर्सला १२८ धावांवर रोखले. फिरकीपटू वानिंदू हसरंगा, आकाश दीप आणि हर्षल पटेल यांनी कोलकाताच्या फलंदाजांना जखडून ठेवले. हसरंगाने ४ षटकात २० धावा देत ४ बळी टिपले. कोलकाताचा संघ १८.५ षटकात १२८ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात बंगळुरूचीही बरीच दमछाक झाली. पण शेवटच्या षटकात त्यांना हा विजय मिळाला. हसरंगाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बंगळुरूचा डाव

कोलकाताच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाद उमेश यादवने बंगळुरूला दोन धक्के दिले. त्याने सलामीवीर फलंदाज अनुज रावतला शून्यावर तर विराट कोहलीला (१२) यष्टीपाठी झेलबाद केले. टिम साऊदीने कप्तान फाफ डु प्लेसिसला (५)रहाणेकरवी झेलबाद केले. १७ धावांत ३ फलंदाज गमावल्यानंतर डेव्हिड विलीने महत्त्वपूर्ण धावा केल्या. विलीने १८ धावा केल्या. तो सुनील नरिनच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर शेरफाने रुदरफोर्ड आणि शाहबाज अहमद यांनी भागीदारी रचली. संघाचे शतक फलकावर लावल्यानंतर शाहबाज बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. शाहबाजने ३ षटकारांसह २७ धावा केल्या. विजयासाठी २० पेक्षा कमी धावा असताना बंगळुरूने हसरंगाला गमावले. मात्र शेवटच्या षटकात चार चेंडू राखून दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकाताकडून साऊदीने ३ तर उमेश यादवने २ बळी घेतले.

कोलकाताचा डाव

मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी केलेल्या अजिंक्य रहाणेला (९) यावेळी काही खास करता आले नाही. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. दुसरा सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यर (१०) आणि नितीश राणा (१०) यांना बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने तंबुचा मार्ग दाखवला. त्यानंतर फिरकीपटू वानिंदू हसरंगाने फास आवळला. त्याने कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यर (१३), सुनील नरिन (१२), शेल्डन जॅक्सन (०), टिम साऊदी (१) यांना बाद करत कोलकाताच्या मोठ्या धावसंख्येकडे जाण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने १ चौकार आणि ३ षटकारांसह २५ धावा केल्या. त्याच्यामुळे संघाला शंभरी गाठता आली. कोलकाताचा शेपटाकडील फलंदाज उमेश यादवने १८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बंगळुरूकडून हसरंगाशिवाय आकाश दीपने ३ तर हर्षल पटेलने २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!