🕒 1 min read
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीनंतर तो आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. गेल्या आठवड्यात त्याने आपले शीर्षस्थान गमावले होते. जडेजाची जागा वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने घेतली होती.
सध्या इंग्लंडचा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीनंतर होल्डरने जडेजाला पाठी काढत हे स्थान मिळवले होते. मात्र दुसऱ्या कसोटीतील त्याची कामगिरी काही खास झाली नव्हती. याचाच परिणाम म्हणून जडेजाने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले. जडेजाचे ३८५ गुण असून तो पहिल्या क्रमांकावर आहे, तर होल्डर ३५७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत रवीचंद्रन अश्विन ३४१ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने क्रमवारीत एका स्थानाने झेप घेतली असून तो आता ८व्या क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्माला तोटा सहन करावा लागला आहे. तो एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझमनंतर माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “मनोहर जोशींना एक न्याय तर ठाकरेंना दुसरा न्याय का?”- नितेश राणे
- “धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली”, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
- IPL 2022: आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकलेल्या ‘या’ घातक गोलंदाजाने केले मार्क वुडला रिप्लेस
- “गरजने वाले बादल बरसते नही! सत्तेत येऊन…”; भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- आमिरच्या ‘लाल सिंग चढ्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी, जाणून घ्या काय आहे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
