Share

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मात्र ठाकरे सरकारने त्यांचा अजूनही राजीनामा घेतलेला नाहीये, याविरोधातच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. आज पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने आंदोलन करत नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यावेळी ‘राजीनामा दो, राजीनामा दो नवाब मलिक राजीनामा दो’ अशा घोषणाही देण्यात आल्या.  काही दिवसांपूर्वी भाजपने आझाद मैदानात भव्य मोर्चा देखील काढला होता. मात्र मविआ सरकारने अजून तरी मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे भाजप सतत आंदोलन करत आपली भूमिका कायम ठेवत आहे.

दरम्यान राज्यात सध्या ईडी कारवायामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ईडीचा ताफा थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!