🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आज (२२ मार्च) नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास आजपासून सुरुवात होणार आहे. यात शिवसेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाडा दौरा करणार आहेत. त्यासाठीच संजय राऊत (Sanjay Raut ) नागपूर मध्ये पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती, असे म्हटले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी संजय राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे.
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती असे संजय राऊत यांना वाटत असेल तर अजूनही अनिल देशमुख यांना पुन्हा गृहमंत्री करता येईल.
फक्त शपथविधी जेलमध्ये पार पडेल एवढंच. pic.twitter.com/TA19QZ2ILA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 22, 2022
“अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती असे संजय राऊत यांना वाटत असेल तर अजूनही अनिल देशमुख यांना पुन्हा गृहमंत्री करता येईल. फक्त शपथविधी जेलमध्ये पार पडेल एवढंच.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
नेमके संजय राऊत काय म्हणाले?
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. तो निर्णय घाईघाईने झाला असे मला वाटते. त्यांच्यासंदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिले आहे. तसेच तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- ‘द कश्मीर फाइल्स’साठी ‘बच्चन पांडे’चे स्क्रिनिंग जबरदस्तीने थांबवले! पहा व्हिडीओ
- “केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय” – संजय राऊतांची टीका
- भाजप-सेना पुन्हा एकत्र येणे अशक्य; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती- संजय राऊत
- खेळाडू कधीच नाही विसणार आजचा दिवस; ३० वर्षांपूर्वी एका नियमामुळे गमवावा लागला होता वर्ल्डकप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
