Share

…तर विरोधकांच्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येईल- संजय दौंड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२२ मार्च) विधान परिषदेत विरोधकांच्या प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत आमदार संजय दौंड (Sanjay Daund) यांनी संहभाग घेतला. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून येत्या दोन राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून येत्या दोन वर्षात ग्रामीण भागात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून साडेसहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याच्या योजनेसाठी शासनाने ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बीड जिल्ह्यातील रस्त्याला मागील पाच वर्षात मंजुरी मिळाली असताना त्याची पूर्तता झालेली नाही. ती कामे आता पूर्ण होत आहेत. मागील काळात कामे झालेली नसताना आता महाविकास आघाडी सरकारला नावं ठेवण्याचे काम होत आहे.’

तसेच राज्य सरकारने वाईनच्या संदर्भात निर्णय घेतला त्यावर विरोधकांनी टीका केली. मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह वाईनरी उद्योगावर आहे. त्यामुळे यास विरोध केल्यास त्यांच्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येईल, असा इशाराही दौंड यांनी दिला.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कोरोना काळात जी मुले अनाथ झाली त्यांना पाच लाखांची मदत राज्य सरकारने केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले त्यांना ५० हजार रुपये देण्यात आले. आजवर एक लाखाहून अधिक कुटुंबीयांच्या खात्यावर ५०० कोटींच्यावर निधी वाटप केला आहे.’ तसेच पशुधन विमा योजनेअंतर्गत पशु पालकांना विमा कवच देणे गरजेचे आहे. मराठवाड्यात लाल कंधारी, देवनी आणि पश्चिम महाराष्ट्रात खिलार जातीच्या बैलांच्या संवर्धनासाठी वळू माता प्रक्षेत्र निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!