Share

रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. या दोघांमधील युद्धामुळे महाराष्ट्रातील नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांना करोडोंचे नुकसान सोसावे लागत आहे. महाराष्ट्रातील नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी दरवर्षी सुमारे 30 हजार मेट्रिक टन द्राक्षे रशिया आणि युक्रेनला निर्यात करतात, मात्र युद्धामुळे निम्म्याच मालाची निर्यात झाली असून उर्वरित निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे.

नाशिकमधून दरवर्षी सुमारे 30 हजार मेट्रिक टन द्राक्षे रशिया आणि युक्रेनला निर्यात केली जातात, मात्र यंदा केवळ 15 ते 16 हजार मेट्रिक टनच निर्यात होऊ शकली आहे. कारण युद्ध सुरू झाल्यानंतर संपूर्ण निर्यातच ठप्प झाली आहे. द्राक्षे आता भारतात कमी पैशात विकली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले, “रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी 25 ते 26 मेट्रिक टन द्राक्षे रशियात जात होती, मात्र यंदा केवळ 15 ते 16 मेट्रिक टनच द्राक्षे जाऊ शकली आहेत. तसेच युक्रेनमध्ये तीन हजार मेट्रिक टन द्राक्षे जातात, मात्र यंदा केवळ 700 ते 800 टन द्राक्षेच जाऊ शकली आहेत. आता शेतकरी ही द्राक्षे भारतातच कमी किमतीत विकत आहेत, त्यामुळे आमचे खूप नुकसान होत आहे.

नाशिकमधून निर्यात होणाऱ्या द्राक्षांपासून रशिया आणि युक्रेन हे वाईन बनवतात, त्यामुळे दोन्ही देशांत नाशिकच्या द्राक्षांना मोठी मागणी असते, मात्र आता युद्धामुळे संपूर्ण निर्यातच ठप्प झाली आहे. निर्यात झालेली द्राक्षे अनेक महिने शीतगृहात ठेवण्याइतपतही पैसे नाशिकच्या शेतकऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे आता शेतकर्‍यांना निर्यात झालेली द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत कमी भावात विकावी लागत असल्याने नाशिकच्या द्राक्ष शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!