🕒 1 min read
सोलापूर: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या पत्नी करूणा मुंडे (Karuna munde) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. धनंजय मुंडे पाच ते सहा मुलांचे वडील आहे. तरी अद्यापही ते मंत्रीपदावर कायम आहेत. असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वांनाच परिचित आहे. मात्र यावेळी करुणा मुंडे यांनी केलेला आरोप धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान करूणा मुंडे यांनी कोल्हापूर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.
तसेच त्यांनी धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा सिनेमा बनवला तर तो सुपरहिट ठरेल सोबतच महाराष्ट्रातील राजकारणच समोर येईल,असे म्हणत सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शकांची लाईन लागली असल्याचा दावाही करूणा मुंडेंनी केला आहे. सोबतच २०२४ मध्ये आपण परळीमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ…”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- ‘आता तो पहिल्या सारखा फिनिशर राहिला नाही’ ; भारताच्या माजी खेळाडूचे धोनीबाबत मोठे वक्तव्य
- “प्रतिज्ञापत्रात दोन लग्न झाल्याचा खुलासा करा…”- चंद्रकांत पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला
- चित्रा वाघ आणि संबंधित तरुणीची नार्को टेस्ट करा; कुचिक यांच्या मुलीची मागणी
- काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘Me Too’चा आरोप; पहा काय आहे नेमकं प्रकरण..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
