🕒 1 min read
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार न करता तिथीनुसार, साजरी करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसेतर्फे कार्याक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी असंख्य शिवप्रेमींची उपस्थिती होती. आकाशातून रंगीत फुलांची बरसात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर झाली. हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांची बरसात होताना शेकडो मनसे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते.
तसेच शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, ता.जुन्नर, पुणे येथे मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी अभिषेक व पूजन केले. उद्या होणा-या या दिमाखदार सोहळ्यास तमाम शिवभक्त, पक्षाचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
