Share

…अन या भीतीमुळे पीसीबीने टी २० मालिकेसाठी वेन्यू बदलला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:पाकिस्तानमध्ये २९ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि १ टी-20 सामन्यावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेवर दिसून आला. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी याला दुजोरा दिला आहे.

रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे आणि एक टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांना इस्लामाबादमध्ये थांबावे लागले. कारण इथून पिंडी क्रिकेट स्टेडियमचे अंतर फक्त १० किलोमीटर आहे. पण, इस्लामाबादचा राजकीय मूड ज्या प्रकारे बदलला आहे आणि विरोधक इम्रान (imran khan) सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे पाहता, आता इस्लामाबादमध्ये राहण्याची आशा फारच कमी आहे, त्यामुळे पीसीबी लाहोरला पर्यायी ठिकाण सामने हलवत आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीदअहमद यांनी शुक्रवारी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “राजधानीतील राजकीय घडामोडीमुळे सामने लाहोरला हलवले जात आहेत.” ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी गेला आहे. जिथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. अजून एक सामना खेळायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघांना कोणतीही धमकी मिळालेली नाही. पण, एकदिवसीय आणि T20I मालिका लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!