🕒 1 min read
मुंबई: पंजाब किंग्सचा संघ आयपीएलच्या सुरुवातीला नेहमी चांगली कामगिरी करताना दिसतो. त्यांच्या संघात अनेक स्टार खेळाडू खेळले आहेत. मात्र चांगली कामगिरी असूनही पंजाब आयपीएलच्या शेवट पर्यंत ढासळत जातो. याचा परिणाम त्यांच्या स्टार खेळाडूंच्या कामगिरी वरही होताना दिसला आहे. असाच पंजाबचा एक मागच्या सिजनच्या खेळाडूने त्याचा अनुभव शेअर केला आहे.
निकोलस पुरनने (Nicholas pooran) त्याच्या मागच्या सिजनमधील खराब कामगिरीबाबत वक्तव्य केले आहे. “एक व्यावसायिक खेळाडू म्हणून, काहीवेळा मला असे वाटते की, विशेषत: जेव्हा तुम्ही चांगले काम करत नसाल, तेव्हा मीडिया तुम्हाला लक्ष्य करते, बरेच चाहते तुमच्यावर टीका करतात. पण एक व्यावसायिक म्हणून तो आवाज तुमच्या मागे ठेवणे आणि संघासाठी कामगिरी करण्याचा प्रयत्न करणे हे तुमचे काम असते.”
गेल्या सिजनमध्ये पंजाबकडून खेळताना निकोलसला ७.७५ च्या खराब सरासरीने फक्त ८५ धावा करता आल्या .मागची खराब कामगिरी विसरत यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैद्राबादने त्याला १०. ७५ कोटीत खरेदी केले. जी वेस्ट इंडिजच्या खेळाडूसाठी आतापर्यंतची सर्वोच्च बोली ठरली आहे. सनरायझर्स हैद्राबाद त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात राजस्थान रॉयल्सविरुद्ध करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही खाताय ते शेण व आम्ही खातोय ते श्रीखंड’ असा भाजप नेत्यांचा कावा- संजय राऊत
- IPL 2022: ‘आम्ही येथे काहीही सिद्ध करण्यासाठी खेळणार नाही’; स्पर्धेआधीच हार्दिकने स्पष्ट केली भूमिका
- पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत
- धोनीसोबत वादांच्या चर्चेवर गंभीरने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला…
- …अशी विधाने भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी शोभत नाहीत- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
