🕒 1 min read
मुंबई: माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर केलेल्या भूतकाळातील टिप्पण्यांमुळे अनेकांना भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गज खेळाडूंमधील मतभेदावर विश्वास बसला आहे. मग ती २०११ च्या विश्वचषक फायनलमधील त्याच्या ९७ धावांच्या खेळीवरची टिप्पणी असो किंवा २०१२ च्या सीबी मालिकेत धोनीचे कर्णधारपद. मात्र, धोनीसोबतच्या वादांवर गंभीरने आता मनमोकळे उत्तर आहे.
जतीन सप्रू यांच्याशी त्याच्या यूट्यूबवर बोलताना, गंभीरने (gautam gambhir) धोनीसोबतच्या (ms dhoni) अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या. तो म्हणाला, “बघा माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि तो कायम राहील. मी ते आधीही सांगितले आहे , मी ते तुमच्या चॅनेलवरही सांगेन. जर कधी गरज पडली तर मी ते १३८ कोटी लोकांसमोर कुठेही सांगू शकतो. मला आशा आहे की त्याला कधीच गरज भासणार नाही, पण आयुष्यात कधी गरज पडली तर, त्याने भारतीय क्रिकेटसाठी काय केले आहे, एक माणूस म्हणून तो काय आहे यामुळे मी त्याच्या पाठीशी उभा राहणारा पहिला व्यक्ती असेन,” तो म्हणाला.
गंभीरने यावेळी मतभेदांबाबतही स्पष्टपणे सांगितले आहे. “आमच्या मतांमध्ये मतभेद असू शकतात, तुम्ही गेमकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकता, मी कदाचित वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. मला माझी स्वतःची मते आहेत, त्याला स्वतःचे मत आहे. तो कर्णधार असताना मी सर्वात जास्त काळ उपकर्णधार राहिलो आहे… जेव्हा आम्ही आमच्या फ्रँचाइजीसोबत खेळलो तेव्हा आम्ही मैदानावर प्रतिस्पर्धी होतो. पण तो ज्या प्रकारचा क्रिकेटर आणि माणूस आहे त्यासाठी मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- Women’s WC 2022: झुलन गोस्वामीने रचला आणखी एक विक्रम ; मिताली राजसह यादीत समावेश!
- रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
- अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक मार्ग काढू – शरद पवार
- रंग पोचवू शकतात डोळ्यांना इजा! जाणून घ्या कशी घ्यायची काळजी….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
