🕒 1 min read
मुंबई: २६ मार्चपासून आयपीएल स्पर्धेची सुरुवात होत आहे. आगामी आवृत्तीत लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझींची भर पडणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. तो या स्पर्धेत पहिल्यांदा कर्णधारपद भूषवणार आहे. ज्यासाठी त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.
गुजरातबाबत (gujrat titans) बोलताना हार्दिक पंड्या (hardik pandya) म्हणाला, “मी संघात खूप आनंदी आहे. हा एक नवीन संघ आहे आणि खरे सांगायचे तर, आम्ही कोणाला काही सिद्ध करण्यासाठी येथे खेळणार नाही. आम्ही येथे चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. खेळाडूंना त्यांच्या स्वत:च्या क्षमतेनुसार बहरण्यासाठी वातावरण योग्य आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही येथे आहोत. तशी कोणतीही अपेक्षा नाही. आम्ही एक संघ बनणार आहोत जिथे सुनिश्चित केले जाईल की सुधारणा होत आहे.”
.@hardikpandya7 is excited ahead of his stint as captain of @gujarat_titans ???? ????
Watch this space for more! ???? ????
Full interview coming soon on https://t.co/4n69KTTxCB ⌛️ pic.twitter.com/zLyOzYYhaN
— IndianPremierLeague (@IPL) March 18, 2022
गुजरात टायटन्स त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजीत्याच्या सोबतच टूर्नामेंटमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध करेल. ज्याचा कर्णधार हार्दिकचा जवळचा मित्र के एल राहुल आहे. गुजरात संघ सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, त्यांच्या घरच्या मैदानावर सराव करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत
- धोनीसोबत वादांच्या चर्चेवर गंभीरने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला…
- …अशी विधाने भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी शोभत नाहीत- संजय राऊत
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- Women’s WC 2022: झुलन गोस्वामीने रचला आणखी एक विक्रम ; मिताली राजसह यादीत समावेश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
