Share

रशिया व युक्रेन युध्दाचा परिणाम थेट खतांवर

Published On: 

🕒 1 min read

नांदेड :  वर्षभर लागणारा 70 लाख टन डीएपी खताचा पुरवठा भारतात केला जातो. पण यावर्षी अद्यापपर्यंत ही आयातच झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामात खताचा तुटवडा भासणार आहे, असे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी गरजेनुसार आवश्यक खत खरेदी करुन ठेवावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

साठा मुबलक पण खरेदी गरजेनुसारच-

शेती मशागतीची कामे सुरु असतानाच मे महिन्यापासून खताच्या मागणीस सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऐन गरजेच्या वेळी मागणी न करताच आताच लागेल त्या अनुशंगाने खताची खरेदी करणे गरजेचे आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातील सर्वच कृषि सेवा केंद्रात मुबलक खत साठा उपलब्ध असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांची खरेदी करुन आवश्यक खताचा साठा करुन ठेवा. जेणेकरुन रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही असे कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

रशियातून अशी होते खताची आयात-

दरवर्षी डीएपी आणि पोटॅश प्रत्येकी 10 लाख टन आणि एनपीके 8 लाख टन खातांची आयात हा एकट्या रशियामधून होत असते .परंतू सध्याच्या वातावरणामुळे खतांचा पूरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. युध्दाचा परिणाम खतांवर होत असताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!