🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी १८ मार्च हा दिवस खूप खास आहे. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या सचिन तेंडुलकरने शेवटचा एकदिवसीय सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात ‘किंग कोहलीने’ सचिनला त्याच्याच शैलीत निरोप दिला. पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकात विराटचे ‘रौद्र रूप’ दिसले आणि त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
‘चेस मास्टर’ कोहलीने (virat kohli) आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध १४८ चेंडूत १८३ धावांची तुफानी इनिंग खेळली आणि संघाला ६ विकेटने विजय मिळवून दिला. यादरम्यान कोहलीने २२ चौकारांसह गगनचुंबी षटकार ठोकला. कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारताला ३३० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात यश आले. ३३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर गौतम गंभीर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सचिन तेंडुलकरला (sachin tendulkar) पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाजांना आपल्या निशाण्यावर घेतले.
https://twitter.com/SyedUmaiyd/status/1504696586064252928?s=20&t=WO5Om2g-0M3nd6Cc-peoIQ
कोहलीने सचिन (५२) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. आणि त्यानंतर रोहित शर्मा (६८) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. या काळात किंग कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ११वे शतक झळकावले. ४७ व्या षटकात कोहली आऊट झाला आणि अशा प्रकारे त्याने सचिन तेंडुलकरला निरोप दिला. भारताने हा सामना १३ चेंडू राखून सामना जिंकला होता. आजही विराटची आक्रमक खेळी क्रिकेटरसिकांच्या लक्षात ताजी आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “चार राज्यात सत्ता आली असली तरी…”
- ‘महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा’ – संजय राऊत
- IPL 2022: T20 वर्ल्डकपमध्ये जागा बनवण्यासाठी, शमीसमोर बीसीसीआयाची मोठी अट!
- साऊथची श्रीवल्ली सोडून आता मराठीतील ‘या’ पुष्पावल्लीकडे सर्वांच्या नजरा…
- सध्याची राजकीय धुळवड दु:खाची- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
