🕒 1 min read
नवी दिल्ली: हैदराबाद येथील बायॉलॉजिकल इ. लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कोर्बेव्हॅक्स या कोरोना लशीद्वारे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination for 12-14 year olds from tomorrow) उद्यापासून (१६ मार्च) करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान देशातील मुले सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील, असे ट्वीट आरोग्यमंत्री मंडाविया यांनी केले आहे. सोबतच त्यांनी मुलांच्या लसीकरणाची घोषणाही केली आहे. तसेच ६० वर्षांवरील नागरिकही आता वर्धक मात्रा घेऊ शकणार आहे.
बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित!
मुझे बताते हुए खुशी है की 16 मार्च से 12 से 13 व 13 से 14 आयुवर्ग के बच्चों का कोविड टीकाकरण शुरू हो रहा है।
साथ ही 60+ आयु के सभी लोग अब प्रिकॉशन डोज लगवा पाएँगे।
मेरा बच्चों के परिजनों व 60+ आयुवर्ग के लोगों से आग्रह है की वैक्सीन जरूर लगवाएँ।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) March 14, 2022
दरम्यान देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण बुधवार, १६ मार्चपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री मंडाविया यांनी दिली आहे. दरम्यान देशात १२ ते १४ वयोगटातील सात कोटी ११ लाख मुले असून बायॉलॅजिकल ई लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात कोर्बेव्हॅक्स लशीच्या पाच कोटी मात्रा केंद्राला दिल्या असून, राज्यांना त्यांचे वितरण करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- दिनेश कार्तिकने केली भविष्यवाणी म्हणाला “ऋषभ पंतचे नाव धोनीसोबत…”
- संजय राऊतांची भाषा का बदलली हे समजू शकतो- किरीट सोमय्या
- महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो; केशव उपाध्येंचे टीकास्त्र
- Hijab case : कर्नाटक हायकोर्टात आज होणार फैसला; अनेक जिल्ह्यांत कलम १४४
- “त्याला जसे वाटेल तो तसा खेळेल” कर्णधार रोहितने दाखवला ‘या’ स्टार खेळाडूला पाठींबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
