🕒 1 min read
मुंबई: ऋषभ पंतला श्रीलंका विरुद्ध कसोटीत मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे की संघ व्यवस्थापन धडाकेबाज युवा कीपर-फलंदाज ऋषभ पंतला त्याच्या इच्छेनुसार फलंदाजी करू देण्यास तयार आहे, कारण त्यांचे लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणे आहे.
रोहितने (Rohit sharma) हा मुद्दाही अधोरेखित केला की पंतला परिस्थिती आणि सामन्याच्या परिस्थितीचा आदर करण्यास सांगितले आहे. ज्यानंतर ऋषभच्या (rishabh pant) गेम प्लॅनमध्ये सुधार आला आहे. रोहित म्हणाला “तो कसा फलंदाजी करतो हे आम्हांला माहीत आहे आणि एक संघ म्हणून, आम्ही त्याला ज्या प्रकारे फलंदाजी करायची आहे त्याप्रमाणे फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य देऊ इच्छितो. परंतु खेळाच्या काही विशिष्ट परिस्थिती देखील लक्षात ठेवा, खेळ कोठे चालला आहे, आम्ही ते त्याला सांगितले आहे परंतु आम्हाला एक संघ म्हणून त्याच्या गेम प्लॅनवर टिकून राहायचे आहे.”
रोहितने यावेळी ऋषभच्या फटकेबाजीबद्दल देखील सांगितले ” त्याचे गेम-प्लॅन्स फक्त चांगले आणि चांगले होत आहे, अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही तुमचे डोके फोडून म्हणाल की ‘त्याने तो शॉट का खेळला’ पण तो जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याच्यासोबत हे स्वीकारण्यास आपण तयार असणे आवश्यक आहे.” ऋषभ पंतने ३ डावात ६१ च्या सरासरीने आणि १२० च्या स्ट्राइक-रेटने २८५ धावा केल्याबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं?; हिंदू महासंघाचा सवाल
- IND vs SL : मालिकेत पराभव मात्र या श्रीलंकन खेळाडूचे भारतीय क्रिकेटरसिकांकडून ‘या’ कारणास्तव होतोय कौतुक!
- महागाईच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या…
- ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करा; भाजपची पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- IND vs SL : सुरंगा लकमल शेवटच्या कसोटीत पॅव्हेलियनमध्ये परतण्याआधी भारतीय खेळाडूंनी केले ‘असे’ काही ; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
