🕒 1 min read
मुंबई: देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files movie) या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे. आता या वादात हिंदू महासंघाने उडी घेतली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या ५ वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? असा सणसणीत सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे.
तसेच भाजपवाल्यांनो खोटं-खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका.‘द काश्मीर फाईल्स’चं स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचं सरकार होतं, VP सिंग तुमच्याच पाठींब्यावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन. ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही भाजपचीच चूक आहे. असेही हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “… यांच्यावर फडणवीसांनी आरोप केला त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारला”, अमोल मिटकरींनी शेअर केला व्हिडिओ
- Maharashtra SSC Exams 2022 : राज्यभरात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
- IND vs SL : प्रतिष्ठा , परंपरा , अनुशासन! कर्णधार रोहितने ट्रॉफी सोपवली तरुणांच्या हाती
- “…असे बेजबाबदार विधान करून इम्रान यांनी आपल्याच विरोधातील वणव्यात तेल ओतले”, संजय राऊतांचा प्रहार
- “हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा”, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
