मुंबई: वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे (Mudassir Lambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप असून मुदस्सीर यांचे दाऊदशी संबंध आहेत. तसेच ठाकरे सरकारने चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला. यामुळे एकच खळबळ माजली असतानाच आता राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.
“काल माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात दाउदशी संबंध असल्याचा ज्या डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्यावर आरोप केला त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारतानाचा एक व्हिडिओ प्रेक्षकांनी अवश्य बघावा.”, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे. सोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. तसेच #shameonBJP असेही त्यांनी म्हटले आहे.
काल माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात दाउदशी संबंध असल्याचा ज्या डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्यावर आरोप केला त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारतानाचा एक व्हिडिओ प्रेक्षकांनी अवश्य बघावा.#shameonBJP pic.twitter.com/8nKsYm27dx
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 15, 2022
दरम्यान मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक ३० ऑगस्ट २०१९ रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
IND vs SL : लंकेचा धुव्वा उडवत भारताचा मालिका विजय; रचला नवीन इतिहास!
“…असे बेजबाबदार विधान करून इम्रान यांनी आपल्याच विरोधातील वणव्यात तेल ओतले”, संजय राऊतांचा प्रहार
IND vs SL : प्रतिष्ठा , परंपरा , अनुशासन! कर्णधार रोहितने ट्रॉफी सोपवली तरुणांच्या हाती
“हिंमत असेल तर हे प्रकरण CBI ला सोपवून दाखवा”, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
- रावसाहेब दानवेंच्या फोटोला जोडे मारत नाभिक समाजाचे तीव्र आंदोलन


