Share

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करा; भाजपची पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: १९८० ते १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांकडून झालेला पंडितांवर आत्याचार ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दाखवला आहे. आतापर्यंत कर्नाटकसह, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला आहे. (The Kashmir Files movie tax-free) आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान आता भाजप नेते महेश लांडगे (BJP leader Mahesh Landage) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Chief Minister Uddhav Thackeray) पत्र लिहित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनीही या अगोदर मुख्यमंत्र्यांकडे यासाठी मागणी केली आहे. “जम्मू कश्मिरमध्ये मुस्लिम दहशतवाद्यांनी हिंदूंवर अनन्वित आत्याचार केले. या गोष्टीचे योग्य आणि खरे चित्रिकरण या चित्रपटात केलं आहे, म्हणून हा चित्रपट सरकारने करमुक्त करावा. ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पहावा यासाठी सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

https://twitter.com/maheshklandge/status/1503571048213540869

दरम्यान हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला असून झी स्टुडिओ आणि अभिषेक अग्रवाल आर्टस् हे निर्माते आहेत. त्याचबरोबर मुख्य भुमीकेत अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!