Share

Maharashtra SSC Exams 2022 : राज्यभरात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल २०२२ दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २१ हजार ३८४ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला असून लेखी परीक्षेत ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिट तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.

दरम्यान, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून त्याला अनुसरून बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!