🕒 1 min read
मुंबई: बारावी बोर्डाचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ माजली होती. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला होता. मात्र आता यावरच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
“नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला, त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही.”, असे स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करताना म्हटले आहे.
दरम्यान मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली असून मुकेश यादव असे या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याबाबतीतही पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न; संघटना मजबूत करण्यासंबंधी चर्चा
-
जखमा तलवारीनेच होतात असे नाही, कधी कधी पेन ड्राईव्ह सुद्धा…- अतुल भातखळकर
-
IPL 2022: आयपीएलमध्ये गोलंदाजीबद्दल हार्दिक पंड्याने केला खुलासा; म्हणाला…
-
“गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
