🕒 1 min read
मुंबई : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आल्याने आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच सागर बंगल्याबाहेर देखील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘कमाल आहे. काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेस्टइंडीज खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, इंग्लंड संघाने आमचा…
- वडिलांचा विरोध असतानाही नागराजने घरी आणला बाबासाहेबांचा फोटो; काय झाले पुढे?
- “देवेंद्र फडणवीसांचा दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतोय”, चंद्रकांत पाटलांचा दावा
- “…पण महाराष्ट्रात यश मिळेलच असं नाही”, गुलाबराव पाटलांचा भाजपला जोरदार टोला
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मिळणार 65 टक्के अनुदान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
