Share

‘भाजपची कोणतीही लाट नाही’ – अमोल मिटकरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Election Results) काल जाहीर झाले. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. तसेच यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपची कोणतीही लाट नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेक वृत्तवाहिन्या मोदी लाट कायम असल्याचं दाखवत आहेत. परंतु पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांची माहिती घेतली तर भाजपची परिस्थिती वाईट आहे, असा दावा राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. २९ पैकी केवळ १० राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तर तीन राज्यांमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!