Share

भाजपच्या यशानंतर मोदींचा गुजरात दौरा; रोड-शो मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा

Published On: 

🕒 1 min read

गुजरात: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. पंजाब व्यतिरिक्त चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) गुजरात दौऱ्यावर पोहचले आहेत. ते दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

दरम्यान पंतप्रधान मोदी आज सकाळी १० वाजता दिल्लीहून अहमदाबाद विमानतळावर पोहोचले, त्यानंतर त्यांनी विमानतळावरुनच रोड शोला सुरुवात केली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोदींच्या रोड शोमध्ये जय ‘श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कालच्या निकालानंतर युपीमध्येही जय ‘श्री राम’ च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. रामं मंदिर निर्मितीमुळे मोदींनी लोकांच्या मनातील आपली जागा अधिक द्रुढ केल्याचे यावेळी दिसून आले.

दरम्यान नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित असतील. त्यानंतर संध्याकाळी मोदींच्या हस्ते खेळ महाकुंभ कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!