🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या १२ मार्चपासून सुरू होणार्या दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी कराचीत दाखल झाला आहे. संघ कराचीतील त्यांच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स कॅरी सोबत एक मजेशीर घटना घडली ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
झाले असे कि, ऑस्ट्रेलिया संघ कराचीत हॉटेलमध्ये पोहचला. तिथे कॅरी (alex carry) नॅथन लियॉनशी (nathan lyon) बोलत बोलत चालला होता. याचवेळी तो चुकून स्विमिंग पूलमध्ये पडला. घटनास्थळी उपस्थित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या हशावर नियंत्रण ठेवता आले नाही कारण कॅरी देखील याबद्दल हसत असल्याचे दिसले. हा क्षण ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (pat cummins) टिपला, त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला.
https://www.instagram.com/p/Ca6ax6StLZg/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा दौरा करत आहे. ज्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यांवरून अनेक मोठे वाद सुरु झाले आहेत. आयसीसीने सामना खेळल्या गेलेल्या रावळपिंडीच्या पीचला कमी रेट केले आहे. दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून कराची येथे सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या
- २०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
- “महाराष्ट्रातील सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते”; काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य
- ‘पंजाबमध्ये राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं’ – संजय राऊत
- “जिथे देवेंद्र फडणवीस तिथे यश”, चंद्रकांत पाटलांचा दावा
- आली लहर केला कहर..! उर्फी जावेदकचा टॉपलेस व्हिडिओ पाहून फॅन्सला बसला धक्का…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
