🕒 1 min read
नवी दिल्ली: पणजी उमेदवार उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तर भाजपचे बाबुल मोन्सेरात यांचा विजय झाला आहे. तर कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांचाही विजय झाला आहे.
दरम्यान उत्पल पर्रीकर यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र आलेल्या कलांनुसार पर्रीकर यांचा पराभव झालायचे दिसत आहे. दरम्यान भाजपला मिळत असलेल्या यशाचा जल्लोष भाजप देशभर साजरा करताना दिसून येत आहे. आज संध्याकाळी भाजप मुख्यालयात भाजप जल्लोष साजरा करणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती असणार आहे.
दरम्यान गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई दिसून येत आहे. भाजप सध्या १७ जागांनी तर काँग्रेस १२ जागांनी आघाडीवर आहे. मात्र सेनेचे निराशादायक निकाल समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
