🕒 1 min read
मुंबई: जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर गुजरात टायटन्समध्ये त्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. रॉयच्या जागी रैनाने यावे असे बऱ्याच क्रिकेट रसिकांचे मत होते. मात्र आता गुजरात टायटन्सने रॉयची रिप्लेसमेंट सापडली आहे. संघात रैनाला जागा मिळाली नाही मात्र एका तरुण खेळाडूची वर्णी लागणार आहे.
IPL साठी गुजरात टायटन्स (Gujrat titans) जेसन रॉयच्या (jason roy) जागी अफगाणिस्तानचा हार्ड हिटिंग सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज (rahmanullah gurbaj) याला संधी द्यायचे निश्चित केले आहे. सलामीवीर म्हणून १५० पेक्षा जास्त करियर टी २० स्ट्राइक रेट असलेला गुरबाज हा एक विकेटकीपर देखील आहे. ज्यामुळे तो एक अष्टपैलू खेळाडू आहे.विशेष म्हणजे त्याने कारकीर्दीत ६९ टी-२० सामन्यांमध्ये ११३ षटकार लगावले आहे. त्याची हि क्षमता स्पर्धेत इतर संघाना दबावात आणण्यास मदत करेल.
Some call it a schedule, we call it a Hit List! ????
Mark your ????️#GujaratTitans pic.twitter.com/FTGifl5qUY
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 6, 2022
गुजरात टायटन्सने अद्याप अधिकृतपणे गुरबाजला रिप्लेसमेंट म्हणून अद्याप घोषित केलेले नाही. ते अजूनही बीसीसीआयच्या हिरवा कंदीलची वाट पाहत आहेत. परंतु, असे समजले जाते की संघाच्या थिंक-टँकने फिरकीपटू रशीद खान, जो राष्ट्रीय संघात गुरबाजचा वरिष्ठ होता, त्याच्याकडून विस्तृत माहिती घेतली आहे. गुजरात मध्ये असलेला मॅथ्यू वेड फक्त आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध असेल. पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान्स आणि इस्लामाबाद युनायटेड, लंका प्रीमियर लीगमध्ये कॅंडी टस्कर्स आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्सकडून खेळलेला गुरबाज फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नावाजलेला खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मी चव्हाण वकिलांना भेटलो म्हणजे कुठल्या बाईला भेटलो का?”; अनिल गोटे संतापले
- “देवेंद्र फडणवीस खोटो आणि लबाड माणूस” ; राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंचे टीकास्त्र
- “हे फक्त नौटंकी करत आहेत..”- किरीट सोमय्या
- आमच्या घरात घुसला तर आम्हीही तुमच्या घरात घुसू – संजय राऊतांचा इशारा
- फडणवीसांनी सरकारच्या कटकारस्थानांचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह केला सुपूर्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
