मुंबई : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने आज छापा मारला. राहुल कनाल हे युवासेनेचे पदाधिकारी देखील आहे.
राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाइन अलीमडा इमारतीमधील घरी आज सकाळी झाडाझडती झाली. आयकर विभागाच्या पथकाने सकाळी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. या धाडेबद्द्ल जोरदार चर्चा चालू आहे. राहुल कनाल हे उद्योजक असून युवासेनेचे सक्रिय पदाधिकारी देखील आहेत. आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत.
राहुल कनाल यांच्या छापेवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही” असा पलटवार करत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
