Share

नाटकी कलाकारांची ‘झुंडशाही’..! महेश टिळेकर संतापले  

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर एक पोस्ट करत मराठी कलाकारांवर टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार कलाकारांची स्तुती करणारे काही ग्रुप, टोळी मराठी चित्रपट सृष्टीतली आहेत. स्वतःला सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे, तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे असे यांना वाटत आहे,” असे महेश टिळेकर म्हणाले.

महेश टिळेकर पुढे म्हणाले, “आपल्याच ग्रुप, कंपू मधील कलाकार, दिग्दर्शकांच्या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर स्वतः च्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार, दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात?”

https://www.facebook.com/mahesh.tilekar.5/posts/2246333262174562

“स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या चित्रपटावर, अभिनयावर बोलताना तोंड का बंद होतात यांची? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो पोस्ट करणारे हे काही स्टार कलाकार आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट?” तर ही पोस्ट चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही असे ही त्यांनी यात सांगितले आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!