Share

“दोन्ही कर्जमाफी योजनांमधून राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का”?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा काँग्रेस लाऊन धरलेला आहे. राज्यात 2016 साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले या दोन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी मांडला आहे. सर्व शेतकऱ्यांचे या प्रश्नाकडे लक्ष लागले आहे.

शेतकरी कर्जमाफी संदर्भात अधिवेशनात नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला व ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनामधून काही शेतकरी पात्र असतानाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. जे शेतकरी नियमित कर्ज भरतील अशा शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. हे शेतकरी देखील या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

तसेच जे शेतकरी कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटल मेंटचाही पर्याय दिला होता तर या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, या शेतकऱ्यांना लाभ मिळेल का ? असा प्रश्न जेव्हा विचारला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी योजनेचे उदिष्ट्य सरकार लवकरच पूर्ण करेल असे नाना पटोले यांच्या प्रश्नावर उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!