Share

नवाब मलिकांच्या कोठडीत वाढ होताच राऊतांची पत्रकार परिषदेची घोषणा; उद्या काय खुलासा करणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्वीट करत राजकारणात चर्चा घडवली आहे. उद्या चार वाजता शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद असणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे. तर आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) उद्या नवाब मलिक यांच्याबाबत काही खुलासा करणार का, अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना ७ मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावली. तद्पश्चात आता विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संजय राऊत यांनी शिवसेना पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान यापूर्वी संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा निकॉन कंपनीसंबंधी घोटाळा, तसेच भाजप नेते मोहित कंबोज, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. दरम्यान सानाज्य राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे ते उद्याच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्याबाबत बचावात्मक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपने मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरून लावली आहे. त्यामुळे मविआ सरकार आता कोणता पवित्रा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!