🕒 1 min read
नवी दिल्ल्ली: संपूर्ण जगाचे ज्याकडे लक्ष लागले आहे, त्या रशिया युक्रेन युद्धाचा आज १२वा दिवस आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे काम देखील “ओपेरेशन गंगा” च्या माध्यमातून सुरु आहे. यातच आता पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. हा फोन कॉल सुमारे ५० मिनिटे चालला. या कॉल दरम्यान मोदी आणि पुतिन यांच्यात युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा झाली. पुतिन यांनी मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली, अशी माहिती सरकारच्या सूत्रांने एएनआयने दिली आहे.
रशिया युक्रेन युद्ध्याचे गंभीर पडसाद युक्रेनमध्ये पडत आहेत. युक्रेनियन नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. हे युद्ध थांबावे असे पूर्ण जगाला वाटते आहे. यातच आता रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला केले आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली. या निर्बंधांमुळे रशियाची चांगलीच कोंडी झाली आहे.
रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणाऱ्यांची संख्या सुमारे १५ लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
